03-07-2019
दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची ६ वी पत्नी हया बिंत अल हुसेन या आपल्या दोन मुलांसह ३१ दशलक्ष पौंड एवढी रक्कम घेऊन देश सोडून गेल्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
मात्र, त्यांच्या पलायनावरुन जर्मनी आणि युएई या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कारण जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे. हया यांना परत पाठवा अशी मागणी दुबईचे राजे शेख मोहम्मद यांनी जर्मन सरकारकडे केल्याचे समजते. मात्र त्यांना परत पाठवण्यासाठी जर्मन सरकारने विरोध केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
....22-06-2019
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी भारतातून पळ काढला. आता भारत सरकार त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
आरोग्याचे कारण देत चोक्सीने चौकशीसाठी भारतात येण्यास वारंवार टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्याला अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी आम्ही एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार असल्याचे ईडी यांनी सांगितले. यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्र म्हंटले आहे.
....21-06-2019
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारतातच नव्हे तर जगभरात शक्तिशाली नेता म्हणून सिद्ध झाले आहेत. ब्रिटीश हेराल्डच्या जगातील शक्तिशाली नेत्याच्या पोलमध्ये वाचकांनी सर्वाधिक मते मोदी यांना दिली आहेत. या पोलमध्ये आतापर्यंत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंगसारख्या नेत्यांनाही स्थान मिळाले होते. मात्र, २०१९ च्या पोलमध्ये मोदींनी सर्वांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
ब्रिटीश हेराल्डच्या या पोलमध्ये २५ हुन अधिक नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. ब्रिटिश हेराल्ड यांनी जगातील शक्तिशाली नेता निवडण्यासाठी एका विशेष पद्धतीचा अवलंब केला होता. ब्रिटिश हेराल्डने वाचकांना वन टाइम पासवर्ड दिला होता. यामुळे कोणीही एकापेक्षा अधिक वेळा मत देऊ शकत नव्हते.
....02-03-2019
आफ्रिकी देश असलेल्या युगांडामध्ये सोशल मीडियाच्या वापरावर आता टॅक्स अर्थात कर लावण्यात आला आहे. यामुळे येथील लाखो लोकांनी इंटरनेटचा वापर बंद केला आहे. यावर विरोधकांनी टीका केली असून सरकार आपले अपयश लपविण्यासाठी लोकांच्या अधिकारावर गदा आणत असल्याचे म्हटले आहे.
जगातील सोशल मीडियावर टॅक्स लावणारा युगांडा हा पहिला देश ठरला आहे. युगांडा सरकारने फेसबुकसह 60 सोशल मीडिया साईट्सवर प्रतिदिवस 100 सेंट म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 66 रुपये टॅक्स लावला आहे.
राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी गॉसिपवर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियावर टॅक्स लावण्याचा प्रस्ताव दिला होता. या टॅक्समध्ये फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि ट्विटरसह 60 सोशल मीडिया साईट्स आहेत. यामुळे आतापर्यंत 25 लाख लोकांनी इंटरनेटचा वापर करणे बंद केले आहे.
दरम्यान सरकारच्या निर्णयानंतर 12 लाख लोकांनी टॅक्स भरला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर देशात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
....02-03-2019
पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंध खराब झाले असताना भारताच्या शेजारी असलेल्या चीनने शुक्रवारी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान या देशांना परमाणू राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांच्यातील व्हिएतनाममधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर उत्तर कोरियाला अशा प्रकाराचा दर्जा देण्यास चीनने नकार दिला आहे.
चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता लू कांग यांनी म्हटले की, चीनने भारत आणि पाकिस्तान या देशांना कधीही परमाणू राष्ट्र म्हणून मान्यता दिली नाही. या संदर्भात चीनची भूमिका बदलली नाही. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, चीन उत्तर कोरियाला परमाणू राष्ट्र म्हणून मान्यता देणार का.
....
02-03-2019
अमेरिकेने अतिरेकी संघटना अल-कायदाचा प्रमुख राहिलेला ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याचा पत्ता सांगणाऱ्याला बक्षीसाच्या स्वरुपात मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.
जो व्यक्ती हमजा बिन लादेनचा पत्ता सांगेल त्याला सात कोटी रुपये देण्यात येणार आहे. अमेरिकेनुसार हमजा आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदल घेण्याची योजना बनवत आहे. त्यामुळेच अमेरिकेने एवढ्या मोठ्या पुरस्काराचा घोषणा केली आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने शुक्रवारी या संदर्भात घोषणा केली आहे.
....
28-02-2019
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तनाव असून हवाई हल्ले करण्यात येत आहे. यातच आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी बुधवारी पॉम्पियो यांच्याशी फोनवर चर्चा केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोभाल यांनी अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांना सांगितले की, भारताकडून केवळ पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. यावर पॉम्पियो यांनी सांगितले की, अस केल्यावरच दोन्ही देशांमधील तनाव कमी होईल. यावेळी त्यांनी अतिरेकी कारवायाविरुद्ध अमेरिका भारतासोबत असल्याचे म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईचे ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सने समर्थन केले आहे.
....28-02-2019
पाकिस्तानत सुरू असलेल्या अतिरेकी कारवायाविरुद्धच्या भारताच्या मोहिमेला अमेरिका, रशिया आणि फ्रान्सनंतर जपानचे समर्थन लाभले आहे. पाकिस्तानने अतिरेक्याविरुद्ध कठोर करवाई करावी, अशा सूचना जपानच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जपानचे विदेशमंत्री तारो कोनो यांनी निदा केली आहे. तसेच पाकिस्तानने अतिरेक्यांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन देखील कोनो यांनी केले आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती असून उभय देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहे.
....
28-02-2019
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टी यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो यांनी बुधवारी पाकिस्तानचे इमरान खान सरकारला भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने अभिनंदन यांना अटक केल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचे मीग 21 विमान कोसळले, त्यावेळी त्यांना नियंत्रण रेषेवर पकडण्यात आले. भारतकडून त्याची पुष्टी करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील अनेक युवकांना शांती, मानवता हवी आहे. त्यामुळे शांतीचा संदेश देण्यासाठी इमरान खान सरकारने भारतीय कमांडरला सोडून द्यावे, असंही फातिमा भुट्टो यांनी म्हटले आहे.
....28-02-2019
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा अतिरेकी संघटना जैश-ए-मोबम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्तर राष्ट्रच्या सुरक्षा परिषदेते प्रस्ताव देण्यात आला आहे.
बुधवारी अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडने हा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र चीनने या प्रस्तावावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही. या प्रस्तावावत पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रस्तावात फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंडने मसूदच्या जागतीक प्रवासावर आणि त्याच्या संपत्तीवर टांच आणण्याची मागणी केली आहे.
14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील सीआरपीएफच्या गाडीवर जैशेकडून अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 40 हून अधिक जवान शहिद झाले होते.
....27-02-2019
पाकव्यप्त काश्मीमरध्ये भारतीय वायुसेनेच्या वतीने अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानात गोंधळ उडाला आहे. तसेच पाकिस्तानची यंत्रणा पूर्णपणे हादरली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत भारतावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.
दरम्यान भारताच्या कारवाईनंतर संसदेत पंतप्रधान इमरान खान शेम शेम.. असे नारे लागले. तसेच पाकिस्तानच्या संसदेत गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी पाकिस्तानातील विरोधी पक्षाने इमरान खान मुर्दाबादचे नारे दिले.
....27-02-2019
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर कोरियाचे नेते किम जोंग दुसऱ्यांदा भेटणार आहे. त्यासाठी किम जोंग मंगळवारी व्हिएतनाममध्ये दाखल झाले आहेत. एका खास ट्रेनने किम व्हिएतनाममध्ये पोहोचले आहे.
किम येथून 170 किमी अंतर कारने जाणार आहे. हा त्यांचा राजकीय दौरा असून बख्तरबंद रेल्वेने किम यांनी अडीच दिवसात चार हजार किलोमीटरचे अंतर पार केले आहे. प्योंगयांग ते डोंगडांग हे अंतर पार करण्यासाठी किम यांना 60 तासांचा कालावधी लागला. या भेटीसाठी व्हिएतनाम सरकार उत्साहित आहे.
....27-02-2019
चीनमधील वुझेन येथे रशिया-भारत- चीनच्या परदेश मंत्र्यांची 16 वी बैठक सुरू आहे. यामध्ये सुषमा स्वराज यांनी पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी सुषमा म्हणाल्या की, भारताने पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध काहीही केले नसून येथील एकाही सैन्याच्या स्थाळावर हल्ला केला नाही.
भारताकडून केवळ अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे. भारत सीमेवर तनाव वाढण्यासाठी इच्छूक नाही. पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताकडून मंगळवारी पाकव्यप्त काश्मीरमधील अतिरेकी तळांवर हल्ला करण्यात आला होता.
....27-02-2019
वॉशिंग्टन
पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनंतर अमेरिका देखील भारतासोबत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी पाकिस्तानला आपल्या देशातील अतिरेकी ठिकांनांना नष्ट करण्याचा सूचना केला आहे. पाकिस्तानने अतिरेकी संघटनांवर कारवाई केल्यानंतरच दोन्ही देशांत शांतता निर्माण होऊ शकते, असंही पॉम्पियो यांनी म्हटले आहे.
दरम्यान पॉम्पियो म्हणाले की, मी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना देखील मी पाकिस्तानातील अतिरेकी स्थळ नष्ट करण्यास सांगितले.
....24-02-2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव कमी करण्यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. मात्र, सध्याची परिस्थीती पहाता भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये सध्या नाजूक स्थिती आहे. भारतानं या हल्ल्यात जवळपास 40 जवान गमावले आहेत. त्यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव निवळावा असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चा प्रक्रियेत अनेकांचा सहभाग आहे. चर्चेत समतोल साधण्याचे सध्या आव्हान आहे,’ असे ट्रम्प यावेळी म्हणाले.
....