क्रीडा

विराट अन् आजीबाईंचा फोटो पाहून अनुष्काने केली ही कमेंट्स

03-07-2019

विश्वचषकतील उपांत्य फेरीसाठी खेळला जाणारा सामन्यात भारताने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. त्यादरम्यान ८७ वर्षांच्या आजींनी भारताला हातात भली मोठी पिपाणी घेऊन चेअर केल.सामना संपेपर्यंत त्या आजी एवढ्या प्रसिद्ध झाल्या की भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्वतः त्यांची भेट घेतली.

विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आजीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.फक्त विराटच नाही तर रोहित शर्मानेही या आजींची भेट घेतली.


मात्र सध्या सोशल मीडियावर विराटच्या या भेटीच वैयक्तीक कौतुक केलं जात आहे.
सोशल मीडियावर विराटचे चाहतेच नाही तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने देखील विराटचे कौतुक केले आहे.

सामना संपल्यानंतर विराटने आजींसोबतचे काही फोटो शेअर केले. आणि खास संदेश लिहिला. त्यात तो म्हणाला की, ‘एवढ्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी सगळ्या चाहत्यांचे धन्यवाद खास करुन चारुलता पटेल यांचे आभार.

....
अधिक वाचा
उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताची कसोटी

02-07-2019

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर आता भारताला उपांत्य फेरीत स्थान बळकट करण्यासाठी बांगलादेशविरूद्धचा आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश अशा महत्वपूर्ण लढतीस काहीच वेळात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

....
अधिक वाचा
भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच भारतीय संघ पराभूत – मुफ्ती

01-07-2019

भारतीय संघाने काल इंग्लंडसोबतचा सामना गमावला. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी धोनीवर खापर फोडले तर काही जणांनी टीम इंडियाची जर्सी भगवी असल्याने त्यांचा पराभव झाल्याचे सांगितले आहे.

टीम इंडियाने भगवी जर्सी घातल्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचे महबूबा मुफ्ती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की मी अंधविश्वास ठेवत नाही,मात्र हे खर आहे की, टीम इंडियाने भगवी जर्सी घातली त्यामुळेच ते इंग्लंडशी तब्बल २७ वर्षांनी पराभूत झाले आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाची जर्सी भाजपमुळे भगवी केली आहे. त्यामुळेच संघ पराभूत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

....
अधिक वाचा
भारतीय संघाच्या पराभवाला धोनी,जाधव जबाबदार..?

01-07-2019

इंग्लंडने धमाकेदार खेळी करत भारतासमोर ३३४ धावांचे मोठे डोंगर उभे केले होते. त्यामुळे तब्बल २७ वर्षांनी भारतीय संघाचा पराभव झाला. हा पराभव धोनी आणि केदार जाधव यांच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

आलोचकांनी धोनी आणि जाधवच्या खराब खेळीमुळेच भारतीय संघावर पराभवाची नामानुष्की ओढावली असल्याची आरोप केला आहे. धोनी याने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या तर केदार जाधव याने १२ चेंडूत १३ धावा काढल्या. अशा खराब खेळीमुळे सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर टीका केली जात आहे.

कारण रोहित शर्माने शतकीय पारी खेळली, त्यानंतर विराट कोहली याने ६६ धावा काढल्या. यानंतर देखील संघाला विजय मिळवता आला नाही. यामुळे शेवटी धोनी आणि केदार जाधव यांनी खराब खेळ दाखवल्यामुळेच असे झाल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.

....
अधिक वाचा
पंचांशी हुज्जत : विराट बसला दंड

24-06-2019


साउदॅम्पटन - भारताचा कर्णधार विराट कोहली याने पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल एक दिवसाच्या मानधनाच्या 25% रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे.अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या लढतीच्यावेळी ही घटना घडली.

झाले असे की, सामन्याच्या 25 व्या षटकात जसप्रित बुमराह याचा चेंडू अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाह याच्या पायावर जोरात आदळला.पायचीतचे अपील करताना कोहली याने पंच अलीम दार यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्याशी हुज्जत घातली.


पंच दार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केलेल्या नियमावलीचे उल्लंघन कोहली याच्याकडून झाले असल्याचा अहवाल देत कोहली याला एक दिवसाच्या मानधनातील 25% रक्कम दंड म्हणून कपात करण्याचा निर्णय दिला आहे.

....
अधिक वाचा
क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग घेणार रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग ?

22-06-2019

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दोन रिअ‍ॅलिटी शोसाठी युवराजला विचारणा झाली असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये ‘बिग बॉस सीझन 3’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या दोन शोची ऑफर असल्याची चर्चा आहे. बिग बॉसचे निर्माते आणि रोहित शेट्टीचा फिअर फॅक्टर शो ‘खतरों के खिलाडी’ यांनी आपापल्या शोसाठी युवराजला विचारणा केल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. मात्र यासंबंधी युवी कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

....
अधिक वाचा
सेहवागची भविष्यवाणी… भारत नव्हे हा संघ जिंकणार विश्वकप

21-06-2019

सध्या विश्वचषकाचा फिव्हर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्या आपल्या संघावर आहे. त्यात आता भारताचा दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने एक भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार त्याने एक अशा संघाला विजयीचा दावेदार घोषित केला आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सेहवाग हा भारताला विजयाचा दावेदार मानत नसून  शोएब अख्तरच्या रावळपिंडी एक्स्प्रेस या युट्युब चॅनेलवर सेहवागने विश्वचषकाच्या विजयी संघाची भविष्यवाणी केली आहे.

वीरेंद्र सेहवागने म्हंटले की, विश्वचषकात इंग्लंडचा संघ माझा फेव्हरेट आहे. इंग्लंडचा संघ विश्वचषकावर नाव कोरु शकतो. याची कारणे सांगताना सेहवाग म्हणाला, इंग्लंडकडे एक-दोन नव्हे तर ११ फलंदाज आहेत. आणि सात गोलंदाज आहेत.

भारत आणि इंग्लंडमध्ये कोण वरचढ आहे हे सेमीफायनलमध्ये समजेलच. दोन्ही संघ ३० जून रोजी मैदानात आमने-सामने येतील. तसेच जर इंग्लंडने यंदाचा विश्वचषक जिंकला नाहीतर कधीच विश्वविजेता बनू शकणार नाही. सध्या इंग्लंडचा संपूर्ण संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचे कर्णधार ऑयन मॉर्गनसहित अन्य खेळाडूही शानदार प्रदर्शन करत आहेत. इंग्लंड संघाचा हाच फॉर्म राहिला तर विश्वचषक त्यांचाच असेल, असे सेहवागने म्हंटले आहे.

....
अधिक वाचा
टी-20 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर मालिका विजय

28-02-2019

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात भारतावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने दोन टी-20 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.

तत्पूर्वी कर्णधार विराट कोहली याच्या तडाकेबाज अर्धशतकीच्या खेळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावत 191 धावांचे लक्ष पूर्ण केले. मॅक्सवेलने 55 बॉलमध्ये 113 धावांची दमदार खेळी केली.

कोहलीने 38 चेंडूत (6 षटकार, 2 चौकार) नाबाद 72 धावा केल्या. विराटने आजच्या सामन्यात 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी20 क्रिकेटमधील विराटचे हे 20 वे अर्धशतक ठरले. सलामीवीर लोकेश राहुलने 26 चेंडूत 47 धावा केल्या. तर यष्टीरक्षक एम.एस.धोनीने 23 चेंडूत (3 षटकार आणि 3 चौकार) 40 धावा केल्या.

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात भारतावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने दोन टी-20 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.

तत्पूर्वी कर्णधार विराट कोहली याच्या तडाकेबाज अर्धशतकीच्या खेळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावत 191 धावांचे लक्ष पूर्ण केले. मॅक्सवेलने 55 बॉलमध्ये 113 धावांची दमदार खेळी केली.

कोहलीने 38 चेंडूत (6 षटकार, 2 चौकार) नाबाद 72 धावा केल्या. विराटने आजच्या सामन्यात 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी20 क्रिकेटमधील विराटचे हे 20 वे अर्धशतक ठरले. सलामीवीर लोकेश राहुलने 26 चेंडूत 47 धावा केल्या. तर यष्टीरक्षक एम.एस.धोनीने 23 चेंडूत (3 षटकार आणि 3 चौकार) 40 धावा केल्या.

....
अधिक वाचा
रोमांचक लढतीत विंडीजचा 29 धावांनी पराभव

28-02-2019

इयान मॉर्गन आणि जोस बटलर यांच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजवर 29 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 418 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर जॉन बेरेस्टोने 56 आणि एलेक्स हेल्सने 82 धावा केल्या. तर इयान मॉर्गनने 103 आणि बटलरने 150 धावा फटकावल्या.

प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ 48 षटकांत 389 धावा केल्या. वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. जॉन कॅम्पबेल आणि शाय होप झटपट बाद झाले. मात्र ख्रिस गेलने शानदार फलंदाजी करताना शतकी खेळी केली. त्याने 97 चेंडूत 162 धावा केल्या. तर डेरेन ब्रोव्होने 61 आणि क्रेग ब्रेथवेटने 50 धावा केल्या.  

....
अधिक वाचा
भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात विराट कोहलीची प्रतिक्रिया

24-02-2019

भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या विश्वचषकातील सामन्याबाबत भारत सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असणार, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली आहे.

आम्ही सरकारचा आदर करत असल्याने बीसीसीआय आणि सरकारचा जो निर्णय होईल त्याला भारतीय संघाचा पाठिंबा असेल, असे कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आगामी विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळू नये, अशी भारतीयांकडून मागणी होत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांचा विश्वचषकातील सामना 16 जून रोजी नियोजित आहे. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचाही विराटने सांगितले. विराट म्हणाला, संपूर्ण राष्ट्राला काय हवे आहे आणि बीसीसीआय जे सांगेन ते आम्ही करणार आहोत. ज्या जवानांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांविषयी भारतीय संघाला सहनुभूती आहे.

....
अधिक वाचा
दक्षिण आफ्रिकेत श्रीलंकेचा ऐतिहासिक मालिका विजय

24-02-2019

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ओशदा फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्याची कसोटी क्रिकेट मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका पहिला आशियाई संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव सर्वबाद 154 वर आटोपला. त्यामुळे आफ्रिकेला 68 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजानी चांगली कामगिरी करत आफ्रिकेच्या संघाला अवघ्या 128 धावांवर रोखले.

पहिल्या डावातील 68 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 128 धावा असं मिळून एकूण 197 धावांचे आव्हान आफ्रिकेने श्रीलंकेच्या संघाला दिले. मात्र श्रीलंकेने हे आव्हान 45.4 षटकांत 2 बाद 197 धावा करत पूर्ण केले. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात ओशदा फर्नांडोने नाबाद 75 आणि कुसल मेंडिसने नाबाद 84 धावा करत श्रीलंकेचा विजय साकारला.

मालिकेत सर्वाधिक 224 धावा करणारा कुसल परेरा मालिकावीर ठरला. तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 84 धावांची खेळी करून संघास विजय मिळवून देणारा कुसल मेंडिस सामनावीरांचा मानकरी ठरला.

....
अधिक वाचा
विश्वचषकात भारताने पाकिस्तानसोबत खेळावे : सचिन

24-02-2019

नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्ताविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत खेळू नये, अशा एक प्रवाह निर्माण झाला आहे. यावर अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात आता सचिन तेंडूलकरने आपले मत व्यक्त केले आहे.

सचिनने म्हटले की, ‘भारतीय संघाने विश्वचषकात नेहमीच पाकिस्तान संघावर मात केली आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा हरविण्याची ही वेळ आहे. जर आपण त्यांना हरवले तर आपल्याला दोन गुण मिळणार आहेत. नाही खेळलो तरी त्यांना दोन गुण मिळतील म्हणजेच पाकिस्तानला मदत केल्यासारखे आहे. पाकिस्तानला सहज दोन गुण मिळवून देणं मला पटत नाही. अर्थात मी देशासोबतच आहे. माझ्यासाठी भारत देश आधी असून त्यामुळ भारत सरकार जो काही निर्णय घेईल मी त्यासोबत मनापासून असेल, असंही सचिनने सांगितले.

....
अधिक वाचा
हेडनच्या मते, ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भारतीय खेळाडू ठरतोय अडचण

19-02-2019

मुंबई

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन याच्या मते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या जबदरस्त फॉर्मात असून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी तो सर्वात मोठी अडचण ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

यावेळी विराट कोहलीसमोर गोलंदाजी करणे युवा गोलंदाज जाय रिचर्डसनला देखील सोप नाही. गेल्या मालिकेत विराटने रिचर्डसनसमोर अडचण निर्माण केली होती. मात्र रिचर्डसनने चांगली कामगिरी केली होती. त्याने विराटला तीन वेळा आउट केले होते. मात्र यावेळी तसं होणार नाही. रिचर्डसनकडे भारतात खेळण्याचा अनुभव नाही, त्यामुळे विराट कोहली ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी घातक ठरेल, असंही हेडनने सांगितले.

....
अधिक वाचा
देशासाठी चेंडूऐवजी ग्रेनेड हातात घेण्यासही तयार : मोहम्मद शमी

19-02-2019

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने जम्मू काश्मीरमध्ये शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यावेळी शमी म्हणाला, भारत देशासाठी मी चेंडू सोडून, ग्रेनेड हातात घेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे शमीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

जेव्हा आम्ही देशासाठी क्रिकेट खेळत असतो, त्यावेळी सैनिक सीमेवर लढत असतात. अशा संकटाच्या समयी आम्ही शहिद जवानांच्या कुटुंबियांसोबत असले पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर शिखर धवनने देखील ट्विटरवर भावनात्मक पोस्ट केली. तसेच शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

....
अधिक वाचा
मी जगातील महान क्रिकेटपटू : ख्रिस गेल

19-02-2019

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर गेलने स्वत:ला जगातील महान क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे. तसेच युवा खेळाडूंना संधी देऊ इच्छित असून आपण विश्वचषक जिंकून क्रिकेट कारकिर्द संपविणार असल्याचे गेलने सांगितले.

मी माझ्या करियरमुळे संतुष्ट आहे. मी जगातील महान क्रिकेटपटू आहे. मी अजुनही स्वत:ला जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज मानतो. नेहमी मानत राहिल, असंही गेल म्हणाला. या वर्षी इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा ख्रिस गेलची अखेरची स्पर्धा असणार आहे.

....
अधिक वाचा