मनोरंजन

सोहामध्ये प्रभाससोबत थिरकणार सलमानची हिरोईन

05-07-2019

बाहुबली फेम अभिनेता प्रभास हिंदी चित्रपट सोहात मुख्य भूमिका करत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची आवडती हिरोईन जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.

या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे.

....
अधिक वाचा
स्वरा भास्करचे हिमांशू शर्मासोबत ब्रेकअप

05-07-2019

स्वरा भास्कर आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग राइटर हिमांशु शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. तब्बल ५ वर्षापासून त्यांचे नाते होते. ते कायम एकमेकांसोबत होते. मात्र आता त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.

हे जोडपे २०१५ पासून रिलेशनशिप मध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा आणि हिमांशू हे एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत. हिमांशु अलीकडे स्वराच्या भावाच्या लग्नात देखील शामिल झाला होता. हे दोघे एकमेकांपासून वेगळे होतील वाटले नव्हते. मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नेमक कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

....
अधिक वाचा
अमिताभ बच्चन यांनी पाणीमय झालेल्या मुंबईवर केले असे ट्वीट

02-07-2019

मुसळधार पावसामुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत केले आहे. त्यात आता याचा फटका सामान्यांसह बॉलिवूड कलाकारांना देखील सहन करावा लागत आहे.मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यात जुहूमध्ये सर्वाधिक पाणी साचले आहे.यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील मुंबईच्या स्थितीवर भाष्य केले आहे.

त्यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली.दरम्यान स्वतः अमिताभ यांनी मुंबईच्या पावसावर एक ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवांशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत.

बच्चन यांनी त्यांच्या सिनेमातील एक फोटो शेअर केला. यात त्यांच्यासोबत झिनत अमान देखील आहेत. यात ते एका होडीत बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘दादा, जरा गोरेगावला न्या’. या फोटोच्यावर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला.

....
अधिक वाचा
आमिर खानने घेतली प्रॉपर्टी विकत, किंमत ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल !

21-06-2019

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने मुंबईत त्याच्या घरा शेजारीच एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे. या प्रॉपर्टीची किंमत ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल.

या प्रॉपर्टीची किंमत जवळपास ३५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आमिरने प्रति स्क्वेअर फीटसाठी ३७ हजार ८५४ रुपये मोजले आहेत. प्राइम प्लाझा बिल्डिंगमध्ये घेतलेल्या या चार ऑफिस युनिटपैकी तीन युनिट दुसऱ्या मजल्यावर आणि एक युनिट चौथ्या मजल्यावर आहेत. यासाठी आमिरने स्टँप ड्यूटीसाटी तब्बल २.१ कोटी रुपयेही दिले आहेत.

....
अधिक वाचा
आयुष्यातील चढ-उतारानंतर अर्जुन करणार पुन्हा कमबॅक

02-03-2019

अर्जुन रामपाल सध्या आपली वेब सिरीज दी फायनल कॉलमुळे चर्चेत आहे. या सिरीजमध्ये अर्जुनने एका डिप्रेस पायलटची भूमिका साकारत आहे. जो की एक सुसाईड मिशनवर निघाला आहे.

अर्जुन म्हणाला, जेव्हा तुम्ही आकाशात असता, त्यावेळी अनेकदा तुम्हाला एकटं असल्यासारखे वाटते. तुमचा एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून शकतो. आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. मी माझी आई गमावली आहे. तसेच बायकोपासून वेगळा झालो आहे. मी सध्या अंत्यंत खडतर परिस्थितीतून जात असून लवकरच पुनरागमन करणार असल्याचे अर्जुनने सांगितले.

....
अधिक वाचा
विराट कोहलीसोबतच्या अफेअरवर अखेर तमन्नाचा खुलासा

02-03-2019

साउथची स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे. बॉलिवूडमध्ये देखील ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिने बाहुबली, अयान आणि वीरम चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या करियर व्यतिरिक्त तमन्ना आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

एकेकाळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी विराट किंवा तमन्ना या दोघांनी देखील यावर काहीही बोलने टाळले. दोघांनी एका मोबाईलच्या जाहिरातीत सोबत काम केले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

तमन्नाने कोहलीसोबतच्या अफेअरवर अखेर मौन सोडले आहे. ती म्हणाली, की त्या जाहिरातीनंतर मी विराटला कधीच भेटले नाही. त्या जाहिरातीत मी फक्त चार शब्द बोललो होते, असंही तिने म्हटले.

....
अधिक वाचा
व्हिडिओ : अक्षय कुमारच्या ‘केसरी’चे पहिलं गाणं रिलीज

28-02-2019

बॉलिवूडमध्ये आता देशभक्तीवर चित्रपट येणार असून यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. सारागढीच्या युद्धावर आधारीत केसरी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले असून आता या चित्रपटातील पहिलं गाण देखील रिलीज करण्यात आले आहे.

चित्रपटाचे ट्रेलर युट्यूबवर लाखो लोकांनी पाहिले आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोपडा नायिकेच्या भूमिकेत आहे. सानू कहंदी हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या गाण्याला रोमी आणि बृजेश शंडल्ल्या यांनी आवाज दिला आहे.

 

....
अधिक वाचा
डॅनिच्या मुलाचे बॉलिवूड डेब्यू ; सोबत दिसणार अनिता राजची मुलगी

28-02-2019

करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात लहानपणीच्या करिना कपूरची भूमिका साकारणारी मालविका राज बॉलिवूडमध्ये डेब्यु करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालविका डॅनी डेन्जोंगपाचा मुलगा रिनजिंग याच्यासोबत आपला पहिला चित्रपट कऱणार आहे.

रिनजिंग डॅनाचा मुलगा असून मालविका अभिनेत्री अनिता राज हिची मुलगी आहे. या दोन्ही कलाकारांनी एक्शन थ्रिलर फिल्स स्क्वॉडमध्ये सोबत काम केलेले आहे.

मालविका आणि रिनजिंग यांच्या चित्रपटाची शुटींग याच वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. दोघेही लहापणापासून एकमेकांचे मित्र आहेत.

....
अधिक वाचा
‘स्त्री’नंतर राजकुमार राव दिसणार ‘या’ एकदा हॉरर सिनेमात

28-02-2019

अभिनेता राजकुमार राव याच्या सुपरहिट हॉरर कॉमेडी स्त्री चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली. आता राजकुमार राव आणखी एका हॉरर सिनेमात काम करताना दिसणार आहे. चित्रपटाचे नाव रुह-अफजा असे आगळे वेगळे आहे.

निर्माते दिनेश विजन आणि फुकरे चित्रपटाचे डायरेक्टर मृगदीप सिंह लांबा हा चित्रपट निग्दर्शित करणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटातील बाकीचे कलाकार अद्याप निश्चित झाले नसून लवकरच  चित्रपटाची नायिका निश्चित करण्यात येणार आहे. या चित्रपटात फुकरे सिनेमा फेम वरुण शर्मा दिसणार आहे. फुकरेमध्ये वरुणने चुचाची भूमिका साकारली होती.

 

....
अधिक वाचा
बेस्ट नवरा होण्यासाठी रणवीरने करिनाला मागितल्या टीप्स

28-02-2019

अभिनेत्री करिना कपूर हिचा रोडियो शो व्हॉट वुमन वॉन्ट चांगलाच पॉप्युलर होत आहे. या शोमध्ये महिलांविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत. या शोमध्ये करिना कपूरच्या अधिकाअधिका पाहुण्या महिलाच असतात. आता हा शो एवढा प्रसिद्ध झाला की, अनेकजण करिनाला सल्ला मागत आहेत.

यामध्ये आता अभिनेता रणवीर सिंह याचे नाव जोडले आहे. रणवीरने नुकताच करिनाला सल्ला मागितला आहे. पत्नी दीपिकासाठी मी बेस्ट नवरा होण्यासाठी मी काय करू, यासाठी मला टीप्स दे असंही रणवीरने म्हटले आहे. त्यावर करिनाने शानदार उत्तर दिले आहे. करिना म्हणाली की, सर्वांना ठावूक आहे, तु दीपिकावर किती प्रेम करतोस. त्यामुळे तुला कोणत्याही टीप्सची गरज नाही, असही करिनाने ट्विटरवरून सांगितले.

....
अधिक वाचा
बोनी कपूर करतायत श्रीदेवीची ‘ही’ साडी निलाम

24-02-2019

मुंबई

श्रीदेवीचं पहिलं वर्षश्राद्ध आज आहे. गेल्या वर्षी याच दिवशी श्रीदेवीचे निधन झाले होते. बॉलिवूडची चांदणी असलेल्या श्रीदेवीच्या आठवणी आजही जशाच्या तशा मनात आहेत.

श्रीदेवीच्या निधनाच्या एक वर्षानंतर पती बोनी कपूर पत्नी श्रीदेवीच्या साडीची निलामी करत आहेत. यामधून मिळणारी रक्कम ते बोनी कपूर चॅरिटीमध्ये दान करणार आहेत. श्रीदेवीची कोटा साडी निलाम करण्यात येणार आहे. ही साडी Parisera नावाच्या वेबसाईटवर निलाम करण्यात आली आहे. या साडीसाठी 49 हजार रुपये किंमत ठेवण्यता आली असून आतापर्यंत या साडीवर एक लाख 25 हजार रुपयांची बोली लागली आहे.

....
अधिक वाचा
अभिनेत्री अमृता खानविलकरचे इस्टांग्राम अकाउंट हॅक

24-02-2019

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. तिचे फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांमध्ये फॉलोअरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे.

अमृताने स्वत: या संदर्भात माहिती दिली आहे. तिच्या फोन मध्ये चालु असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंट तिने ही माहिती चाहत्यांना शेअर केली आहे. एका अनोळखी व्यक्तीने माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केलं असून ,या अकाऊंटवरुन एखादा फोटो, व्हिडिओ किंवा कोणताही मेसेज आला तर तो, मी किंवा माझ्या टीममधील कोणत्याही व्यक्तीने केलेला नसेल. याची मी तक्रार दाखल केली असल्याचे देखील अमृताने सांगितले.

....
अधिक वाचा
तब्बल 19 वर्षानंतर सलमान-भन्साळी येणार एकत्र

24-02-2019

अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी तब्बल १९ वर्षानंतर एकत्र येणार आहेत. भन्साळी यांनी सलमान खानसोबत 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' हे सुपरहिट चित्रपट केले आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला घेऊन ते एका प्रेमकथेवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.

भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमानसोबत नवोदित अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे कथानक अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप चित्रपटाचीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

....
अधिक वाचा
रणवीर सिंह निघाला, सलमान, शाहरुख, आमीरच्या वाटेवर

23-02-2019

मुंबई

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या यशाच्या शिखरावर आहे. रणवीरने पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय असे एकापाठोपाठ सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ब्लॉकबस्टर चित्रपटांची हॅटट्रिक करणारा रणवीर आता सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि आमीर खान यांच्या पावलावर पाउल ठेवऊन वाटचाल करणार आहे.

रणवीरने इतर कालाकारांप्रमाणे चित्रपटासाठी फिस न घेण्याचा निर्णन घेतला आहे. तसेच यापुढे रणवीर आता चित्रपटाच्या प्रॉफिटमधून आपला वाटा ठरवून घेणार आहे. पद्मावत चित्रपटातील अभिनयानंतर रणवीरच्या फिसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रणवीर यानंतर करण जोहरच्या तख्त आणि कबीर खानच्या 83 चित्रपटात दिसणार आहे.

....
अधिक वाचा
दीपिकाने शेअर केले रणवीरचे बेडरुम सिक्रेट

23-02-2019

मुंबई

बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून प्रसिद्ध असलेले दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह लग्नानंतर अनेक कार्यक्रमात सोबत दिसत आहेत. एका अवॉर्ड फक्शनमध्ये दोघांच्या एन्ट्रीचीच चर्चा आहे. या कार्यक्रमात दीपिकाला वुमन ऑफ दी एअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तिने अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

एका प्रश्नाचे उत्तर दीपिकाने असे दिले की, रणवीर देखील शॉक झाला. यावेळी दीपिकाला रणवीरच्या स्टाईल आणि ब्युटी सीक्रेटविषयी विचारण्यात आले. त्यावर दीपिका म्हणाली, रणवीर खुप वेळ अंघोळ करतो, टॉयलेटमध्ये देखील खूप वेळ घेतो. तसेच बेडमध्ये देखील जास्त वेळ घेतो, असं धक्कादायक विधान दीपिकाने केले. त्यानंतर सारवासारव करताना दीपिका म्हणली की मला अस म्हणायच होत की, झोपायला वेळ घेतो.

....
अधिक वाचा