03-07-2019
मुंबई - तब्बल ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. यात १९ जण बेपत्ता असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दुर्घटनेवरून धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सरकारवर चांगला निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे की, ‘रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जण बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी.
सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो!
03-07-2019
बीड – राज्यातील शेतकऱ्याची अवस्था आणखी बिकट आहे. बीड जिल्ह्यात पेरणीसाठी पैसे नसल्याने एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.त्याचे कर्ज केवळ १ लाख ३० च्या जवळपास होते. मात्र ते फेडण्यासाठी त्याची परिस्थिती नव्हती. म्हणून त्यांनी आत्महत्या केली.
तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे उघडकीस आली आहे.
बाळासाहेब रामभाऊ गायकवाड (वय- ४०) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
सततच्या नापिकी आणि कर्जाला कंटाळून बाळासाहेब यांनी पहाटे ५ च्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.बाळासाहेब गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी व तीन लहान मुले आहेत
02-07-2019
पुणे – सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय मुंबई येथे पोस्ट, ईमेल, कुरिअर, फॅक्स अथवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत.
....02-07-2019
मुंबई – सध्या मागच्या ४ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.संपूर्ण मुंबई आता पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आजही पावसामुळे मुंबई, नवी मुंबईसह पुण्यातही पावसाने जोर धरला आहे.
दुपारनंतर पाऊस जरा ओसरला असला तरी पुढच्या ४८ तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
....01-07-2019
पुणे – आज पुणे शहरात दिवसभरापासून पाऊस सुरू आहे. आणि पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. पुणे शहरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर निघावे.
....01-07-2019
औरंगाबाद – शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहराच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही युवकांनी औरंगाबाद या नावावर ‘संभाजीनगर’ अशी पाटी लावल्याने काल रविवारी रेल्वे स्थानक परिसरात काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर २ वरील पाटीवर पिवळा रंग टाकून औरंगाबाद हे नाव मिटवून त्यावर संभाजीनगर अशी पाटी लावण्यात आली होती. ही पाटी लावणाऱ्याने आपण शिवसेनेचे कार्यकर्ता असल्याचं सांगितले. रेल्वे स्थानकावरील हा प्रकार लक्षात येताच एमआयएमच्या काही कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांना सांगितली.
या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी संभाजीनगर नावाची पाटी लगेच हटवली.
....24-06-2019
कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामधील आता नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आहे.
शरद कळसकरला कोल्हापूर एसआयटीने अटक केली होती.मात्र, शरद कळसकरची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला न्यायालयात हजर केले होते.यावेळी कळसकरला ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
21-06-2019
मागच्या अनेक दिवसांपासून आपण सगळे जण पावसाची वाट पाहत आहोत, मात्र पाऊस काही पडत नाही असे चित्र आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार ही माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली.
रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची एंट्री झाली आहे.
....21-06-2019
मुंबई- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना डिसेंबर २०१८ आणि जानेवारी २०१९ या दोन महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपायांचे नुकसान झाले आहे.
त्यातही खारीब हंगामातील कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी कांदा निर्यात करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीसाठी अनुदान सुरु करावे, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे विधानपरिषदेच्या सभागृहात केली.
त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाचे ३ टप्पे पूर्ण झाले. मात्र अजूनही शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मिळालेले नाही. ते अनुदान शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय, पुढील काळात सरकार बाजार भाव हस्तक्षेप योजना तयार करून कांद्याचे नियोजन करणार का? आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी किती कांद्याची खरेदी केली स्पष्ट करावे? वाहतुकीसाठी जे अनुदान आहे त्याचे अंतर ७०० किमी आहे ते ३५० किमी करावे जेणेकरून शेतकरी कांदा निर्यात करू शकेल आणि बीडच्या शेतकऱ्यांनाही कांदा निर्यातीच्या ५० टक्के अनुदानाचा फायदा मिळेल, असे प्रश्न उपस्थित करून धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
....28-02-2019
महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य किंवा सेवापदक धारकांना एकापेक्षा जास्त पदके प्राप्त झाल्यास महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत त्यांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय 29 सप्टेंबर2001 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या सैन्य दलातील अधिकारी किंवा जवान यांना विशेष कार्यासाठी केंद्र शासनामार्फत शौर्य किंवा सेवापदक देऊन गौरव करण्यात येतो. या पदकप्राप्त अधिकारी-जवानांना महाराष्ट्र शासनाकडून रोख रक्कम देण्यात येते. शासन निर्णय 16 ऑगस्ट 2002 नुसार राज्यातील आजी-माजी सैनिकांना एकापेक्षा जास्त शौर्य किंवा सेवा पदके मिळाल्यास त्यांना मिळालेल्या वरिष्ठ पदकासाठीच अनुदान देण्यात येत होते. गौरव पुरस्कार योजनेखाली अनुदान देण्यात आलेल्या अधिकारी-जवानाला भविष्यात त्याहीपेक्षा श्रेष्ठ असे शौर्य-सेवापदक प्राप्त झाल्यास त्यांचा अनुदान देण्यासाठी पुन्हा विचार करण्यात येत होता. मात्र, श्रेष्ठ पदक प्राप्त झालेल्यांना यापूर्वी मिळालेल्या पदकासाठीची रक्कम आणि श्रेष्ठ पदकासाठी द्याव्या लागणाऱ्या अनुदानामधील फरकाची रक्कम देण्यात येते. आजच्या निर्णयानुसार दोन्ही पदकांसाठी स्वतंत्र अनुदान देण्यात येणार आहे.
....
28-02-2019
व्यक्ती, संस्था अथवा कंपनी यांना कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने दिलेल्या राज्यातील शासकीय जमिनीवरील बांधकामास मुदतवाढ देण्याबाबत नवे धोरणात्मक निर्देश लागू करण्याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार आता मुदतवाढीच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यामध्येही कपात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम-1971 मधील तरतुदीनुसार विविध व्यक्ती,संस्था आणि कंपनी यांना विविध प्रयोजनार्थ कब्जेहक्काने अथवा भाडेपट्टयाने जमिनी प्रदान करण्यात येतात. अशा शासकीय जमिनीवरील इमारतीचे बांधकाम तीन वर्षामध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. असे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण न केल्यास, बांधकामास अधिमूल्य आकारुन मुदतवाढ देण्याबाबत 11 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयान्वये धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयान्वये निश्चित केलेले अधिमुल्याचे दर अवाजवी असल्याने ते कमी करण्याबाबत विविध व्यक्ती व संस्थांकडून शासनास विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने 11 जानेवारी 2017 चा शासन निर्णय सुधारित करुन बांधकाम मुदतवाढीसाठी आकारावयाच्या अधिमुल्याचे दर सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. 11 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार बांधकाम मुदतवाढीसाठी अधिमुल्याचे दर हे प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार संबंधित जमिनीच्या येणाऱ्या किंमतीच्या 2 टक्के ते 10 टक्के प्रतिवर्ष या प्रमाणे आकारण्यात आले होते. आता हे दर प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार संबंधित जमिनीच्या येणाऱ्या किंमतीच्या 0.5 टक्के ते 2.5 टक्के प्रतिवर्ष या प्रमाणे आकारण्याचे ठरले आहे.
....26-02-2019
यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता ५० टक्के असल्याचा अंदाज हवामान बदलाचा अहवाल देणाऱ्या 'स्काय मेट' या खासगी संस्थेने दिला आहे.
२०१९ मध्ये देशभरामध्ये सामान्य पावसाची शक्यता आहे. मान्सूनची सुरुवात ही मंद गतीने होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळाचे संकेत आहेत. मात्र, त्यानंतर मान्सूनच्या मध्यकाळात पर्जन्याचे प्रमाण ५० टक्के राहण्याची शक्यता आहे.
यंदा देखील भारतीय हवामान बदलावर 'अल नीनो'चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सरळ परिणाम पर्जन्यावर होणार आहे. त्यामुळे स्काय मेटने अंदाज दर्शवताना अल नीनो प्रभावावरून आपला अंदाज वर्तवला आहे. स्काय मेट ही संस्था सामान्यतः १५ मार्च ते १५ एप्रिलच्या कालावधीत वार्षीक पर्जन्यमानाचा अहवाल प्रसिद्ध करत असते. मार्चपर्यंत स्थिती बदलू शकते, असंही स्कायमेटचे संचालक जतिन सिंह यांचे म्हणणे आहे.
....24-02-2019
वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार काय? यावर भाष्य करताना, वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय अजून प्रलंबित राहण्यामागचे कारण ‘जागांसाठी’ नसून ते वैचारिक मतभेद असल्याचे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणणे ही असून काँग्रेसकडून तसे आश्वासन मिळताच आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
वंचित बहुनज विकास आघाडीची पहिली जाहीर सभा मुंबई येथे सुरू असून या सभेस भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे बॅ.असदुद्दीन ओवैसी यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी ते बोलत होते.
....24-02-2019
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील 40 जवान शहिद झाले. हे शहिद जवान राजकीय बळी असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केला.
राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. राज म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन गट आहेत. त्यामुळे सुरक्षाप्रमुख अजित डोवाल यांची चौकशी करा मग या हल्ल्याचे सत्य समोर येईल. तसेच आगामी निवडणुकीत आणखी एक घटना घडवली जाईल आणि सर्वांचं लक्ष त्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न होईल, असंही राज यांनी सांगितले.
दरम्यान पाकिस्तानचे पाणी अडविण्याचा चर्चा सध्या सुरू आहे. अमित शहा हे काय स्वतः आडवं पडून पाणी अडवनार आहेत का? असा खोचक सवाल देखील राज यांनी विचारला.
....24-02-2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही काश्मिरी विद्यार्थांना मारहाण झाली. याची गंभीर दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मरहाण करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे.
मारहाण झालेले हे विद्यार्थी यवतमाळमधील दयाभाई पटेल फिजीकल एज्युकेशन कॉलेजमध्ये शिकत आहेत. बुधवारी रात्री युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. “काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्यामुळे दहशतवादाबाबत जबाबदार धरून कोणाही भारतीयाला रोषाला सामोरे जायला लागता कामा नये, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
....