राष्ट्रीय

अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्समध्ये घसरण

05-07-2019

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होताच लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरले नाही.

बजेट दरम्यान निफ्टी ११२ अंकांनी कमी होऊन ११८३४ अंकांवर आला आहे. तर सेन्सेक्स ३५० पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन ३९५५० च्या स्तरावर आला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत घसरण सुरू आहे.

 

बँकेच्या डिजिटल देवाण घेवाणीवर चार्ज लागू झाल्यामुळे बँक निफ्टीत जोरदार घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टीत ६४ अंकांची घसरण होऊन ३१४०७ अंकांवर पोचली आहे.

....
अधिक वाचा
इनकम टॅक्स भरण्यासाठी पॅनकार्डची आवश्यकता नाही

05-07-2019

नवी दिल्ली- आधी इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. 

आता पॅनकार्ड शिवाय देखील  इनकम टॅक्स भरू शकता. इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. पॅनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं.

....
अधिक वाचा
या नेत्याच्या मुलावर भडकले मोदी

02-07-2019

नवी दिल्ली – भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या पुत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भडकले. आमदार आकाश विजयवर्गीय यांचा एका महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या घटनेवर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणाचाही मुलगा असो त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे नाव न घेता मोदी यांनी सुनावले.

मोदी म्हणाले कि, कोणात्याही नेत्याच्या मुलाचे असे वर्तन सहन केले जाणार नाही. या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यांनाही पक्षात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्या सर्वांना पक्षातून बाहेर काढायला हवे, अशा कडक शब्दात मोदींनी सुनावले.

....
अधिक वाचा
भारतीय ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक क्षेपणास्र

01-07-2019

नवी दिल्ली – भारतीय लष्कर आता आणखी अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रांची भर पडणार आहे. भारताचा विश्वासू मित्र असलेल्या रशियाकडून भारत अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. यासाठी २०० कोटींचा करार करण्यात आला आहे. एमआय-३५ या लढाऊ हेलिकॉप्टरवर ही क्षेपणास्त्र लावली जाणार आहे.

त्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार भारताच्या लष्कराच्या शस्त्रपुरवठ्यात सर्वात जास्त खरेदी ही रशियाकडून केली जाते.आपल्या खेरदीपैकी ७० टक्‍क्‍यांच्या आसपास खरेदी ही रशियाकडून केली जाते. तर रशियाही भारताला शस्त्र विक्रीसाठी तत्पर असतो. याच टप्प्याचा भाग म्हणून ही खरेदी केली जाणार आहे.

....
अधिक वाचा
‘त्या’ एनकाऊंटर स्पेशलिस्टचे होतेय सर्वत्र कौतुक

24-06-2019

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका ६ महिन्याच्या लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. या प्रकरणातील हत्येचा मुख्य आरोपी नाजिलला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये आरोपीला अटक करण्यात आले आहे.

रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट ‘अजय पाल शर्मा’ यांनी चकमकीदरम्यान आरोपीच्या दोन्ही पायावर गोळ्या घालत पकडले आहे. त्यानंतर, एसपी अजय पाल शर्मा यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

....
अधिक वाचा
मायावतींनी पुन्हा दिला स्वबळाचा नारा

24-06-2019

लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज स्वबळाचा नारा दिला आहे. त्यांनी आगामी सर्व लहान-मोठ्या निवडणूक स्वतःच्या हिमतीवर लढवण्याचे ठरवले आहे.तसेच महागठबंधन संपुष्टात येण्यास समाजवादी पक्षाला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान, आगामी सर्व लहान-मोठ्या निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार असल्याचे मायावती यांनी ट्विटरवर स्पष्ट केले.

मायावती म्हणाल्या की, सपासोबतचे जुने मतभेद विसरून, २०१२-१७ या कालावधीत सत्तेत असलेल्या सपानं घेतलेले दलितविरोधी निर्णय बाजूला ठेवून आम्ही देशहितासाठी त्यांच्यासोबत आघाडी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडी धर्माचं निष्ठेनं पालनदेखील केलं

....
अधिक वाचा
सुरक्षादलाच्या जवानांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

22-06-2019

जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील बोनियारमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची आणि दहशतवाद्यांची चकमक सुरू होती.  या चकमकीत १ दहशतवादी ठार झाला आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.

....
अधिक वाचा
चंद्रबाबू नायडू परदेशात,टीडीपीचे राज्यसभेचे ४ खासदार भाजपात

21-06-2019

नवी दिल्ली – सध्या परदेशात वेळ घालवत असलेले तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  भाजपमध्ये सामील झालेल्यांमध्ये सीएम रमेश, टीजी व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वायएस चौधरी या राज्यसभा खासदारांचा समावेश आहे.
 
या चार खासदारांनी राज्यसभेत टीडीपी भारतीय जनता पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव पास करून याची माहिती राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांना दिली.  राज्यसभेत टीडीपीचे एकूण सहा खासदार होते. त्यापैकी टीडीपीचे आता दोनच खासदार राज्यसभेत आहेत. भाजपमध्ये सामील झालेल्या या खासदारांवर पक्षांतर कायदा लागू होणार नाही. पक्षांतर कायदा केवळ कोणत्याही सभाग्रहातील पक्षाच्या एकतृतीयांश सदस्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सामील होण्याचा अधिकार देतो. त्यामुळे टीडीपीच्या त्या चार खासदारांवर हा कायदा लागू होणार नसून ते खासदारपदी कायम राहणार आहेत.
 
टीडीपीचे राज्यसभा खासदार सीएम रमेश, टीजी व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वायएस चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊ भाजपमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनीच या खासदारांना पक्षात प्रवेश दिला आहे. टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू कुटुंबियांसमवेत परदेशात असताना या खासदांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
यावर चंद्रबाबू नायडू म्हणाले की, आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दौरा मिळविण्यासाठी आम्ही भाजपशी लढलो.  त्यासाठी केंद्रीयमंत्रीपद देखील सोडले.  त्यामुळे टीडीपीला कमकुवत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची आम्ही निंदा करतो. तसेच टीडीपीसाठी असं संकट काही नवीन नाही. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असं आवाहन चंद्रबाबू नायडू यांनी केलं आहे.
....
अधिक वाचा
अभिनंदन यांच्या कमबॅकनंतर ममता बॅनर्जींचे ट्विट

02-03-2019

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी भारतात परतले. त्यानंतर त्यांच्यावर अभिंदनाचा वर्षाव सुरू आहे. यामध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रेटींचा समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अभिनंदन यांच्या मुक्ततेचा आदेश दिला होता.

अभिनंदन भारतात परतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून अभिनंदन वर्धमान यांचे स्वागत केले आहे. अभिनंदनल भारतात, तुमच्या घरी तुमचे स्वागत आहे, असं ममता यांनी म्हटले आहे.

दरम्यान शुक्रवारी भारतात परतल्यानंतर वाघा बॉर्डर येथे अभिनंदन यांचे जोरदार स्वागत झाले.

 

....
अधिक वाचा
अभिनंदन परतण्याचे श्रेय नवज्योत सिंग सिद्धूचे : ओमान चंडी

02-03-2019

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले. पाकिस्तानचे लढावू विमान एफ-16 पाडल्यानंतर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले होते. जिनेव्हा संधीनुसार पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना भारतकडे सोपविले. वाघा बॉर्डरवर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले.

भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन यांचे पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते. त्यावेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती.

अभिनंदन यांच्या मुक्ततेनंतर अनेक नेत्यांची त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

चंडी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नवज्योत सिंग सिंद्धूचे प्रयत्न आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच सद्भावनेसाठी धन्यवाद. यापुढे सीमेवर शांती निर्माण होईल. त्यावर सिद्ध यांनी रिट्विट करताना म्हटले की आपण माझा उत्साह वाढविला. त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी मला आणखी साहस मिळेल.

....
अधिक वाचा
पाकवरील हल्ल्यामुळे कर्नाटकमध्ये भाजप 22 जागा जिंकेल : येडियुरप्पा

28-02-2019

पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे राजकारण करण्यास भारतीय जनता पक्षाने राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी म्हटले की, भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईमुळे भाजपला कर्नाटकमधील लोकसभेच्या 28 पैकी 22 जागांवर विजय मिळेल.

पाकवरील कारवाईमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. या कारवाईमुळे तरुणांमध्ये उत्साह आला आहे. त्यामुळे कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 जागा जिंकण्यासाठी लाभ होईल, अंसही युडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दरम्यान सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपवर करत आहेत.

 

....
अधिक वाचा
समझोता एक्सप्रेस 27 प्रवाशांना घेऊन पाकिस्तानला रवाना

28-02-2019

भारतीय रेल्वेती समझोता एक्सप्रेस सोमवारी 27 प्रवाशांना घेऊन आपल्या निर्धारित वेळेत पाकिस्तानला रवाना झाली. याआधी चर्चा होती की पाकिस्तानने आपल्या आणि वाघा ते लाहोर दरम्यान समझोता एक्सप्रेस रोखली होती.

उत्तर रेल्वेने म्हटले की, भारतातून दिल्लीहून अटारीला जाणारी रेल्वे बुधवारी रात्री 11.20 वाजता रवाना झाली. रेल्वेत तीन पाकिस्तानी आणि 24 भारतीय नागरिक होते. एकून रेल्वेत 27 प्रवाशी असून यामध्ये चार प्रवाशी वातानुकुलीत आणि 23 प्रवाशी बिगरवातानुकुलीत डब्ब्यांमध्ये होते.

दरम्यान समझोता एक्सप्रेसची फेऱ्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून काहीही सुचना मिळाल्या नसल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. आहे.

....
अधिक वाचा
‘हे’ आहेत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान

28-02-2019

भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानच्या लढावू विमानाला हकलून लावताना भारतीय वायू सेनेचे मीग 21 विमान पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये क्रॅश झाले. हे विमान वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चालवत होते. आता पाकिस्तानकडून दावा करण्यात येत आहे, की त्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना अटक केले आहे.

पाकिस्तान मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनंदन वर्धमान स्वत:ला विंग कमांडर सांगत आहेत. त्यांचा सर्व्हिस क्रमांक 27981 आहे. अभिनंदनचे वडील सिम्हाकुट्टी वर्धमान रियार्ड एअर मार्शल आहेत.

अभिनंदनच्या वडिलांनी मणिरत्नमच्या कातेरू वेलियिदईमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे. या चित्रपट नायक पायलट होता आणि त्याला पाकिस्ताननने पकडले होते. अभिनंदन कांचीपुरमपासून 15 किमी दूर असलेल्या तिरुपानामूरचा रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनंदन यांचे लग्न झालेले असून त्यांना दोन मुल आहेत. याआघीच विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हकलून लावताना वायु दलाचे एक विमान क्रॅश झाले असून त्यातील पायलट बेपत्ता आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

 

पाकिस्तानी सेनेने प्रसिद्ध केला व्हिडिओ

पाकिस्तानी सेनेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचे दिसून येत आहे. या पायलटला त्यांनी पाकिस्तान सीमेवरून अटक केली आहे. पायलटच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. तसेच शर्टवर इंग्रजीतून ABHI लिहिलेले आहे.

काय आहे जिनेवा संधी

आंतरराष्ट्रीय जिनेवा संधीनुसार युद्ध कैद्याला घाबरवणे, धमकावने किंवा त्यांचा अपमान करता येत नाही. तसेच युद्धा कैद्याविषय़ी जनतेत उत्सुकता देखील निर्माण करू नये. युद्ध कैद्याला केवळ आपले नाव, सैन्यातील पद आणि क्रमांक सांगण्याचा नियम आहे.

 

....
अधिक वाचा
काश्मीरमध्ये वायुसेनेचे मीग विमान कोसळले; दोन पायलट शहिद

27-02-2019

जम्मू काश्मीरच्या बडगामपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गारेंद गावांत एक मीग लढाऊ विमान कोसळले. हे विमान शेतात कोसळले त्यानंतर त्यात आग लागली. अपघाताचे काऱण अद्याप स्पष्ट झाले नाही.

या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. या विमानाने श्रीनगर एअरबेसमधून टेकऑफ केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मीग विमान पेट्रोलिंगवर होते, त्याचवेळी ते क्रश झाले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान वेगाने जमिनीकडे येत होते, त्यानंतर मोठा आवाज झाला आणि विमान जमिनीवर कोसळले.

....
अधिक वाचा
पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडण्यात भारताला यश

27-02-2019

जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना हुसकून लावण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दोन पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या वायु सीमेचे उल्लंघन केले होते. यावेळी भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे एक लढाऊ विमान त्यांच्यात हद्दीत कोसळल्याचे वृत्त आहे.

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी जेट्स घुसल्यानंतर लगेच भारतीय वायुदलाना कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमान हद्दीतून पळून गेले. यावेळी या विमानांनी परत जाताना भारतीय हद्दीत बॉम्ब टाकले होते.

....
अधिक वाचा