24-06-2019
प्रत्येक पुरूषाला असे वाटते की, आपले वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असावं. मात्र काही कारणास्तव सुखी आयुष्य जगण्यासाठी झगडत असतात. त्यामुळे अशा पुरूषांमध्ये नैराश्य भावना निर्माण होते. मात्र अशा गोष्टीवर नक्कीच मात करता येते.
तुम्ही वैवाहिक जीवनात सुखी समाधानी ही राहू शकता… त्यासाठी गरज असते योग्य उपचाराची…
जर तुम्हाला स्वप्नदोषाची समस्या असल्यास, डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करा, ते रोज सकाळ आणि संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.
पुरुषांनी दररोज केळ खावे. केळ हे पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. त्यामुळे दररोज एक केळ खावे.
शारीरिक कमजोरी असणाऱ्या पुरुषांनी दररोज संध्याकाळी लसणाच्या दोन कुड्या खाव्यात. त्यानंतर पाणी प्यावे. लसूण खाल्ल्याने त्यांची शक्ती वाढते.
....24-06-2019
लग्न हा प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे योग्य जोडीदार मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी लग्नापूर्वी जोडीदाराला हे प्रश्न अवश्य विचारा…
1. हे लग्न मनाविरुद्ध तर करत नाहीस ना? असे स्पष्टपणे होणाऱ्या जोडीदाराला दोघांनी विचारावे.
कारण काहीजण अनेकदा कौटुंबिक दबावाखाली लग्न करतात आणि मग दोघांचीही वाताहत होते. किंवा लग्नानंतर विभक्त होण्याची नामुष्की ओढावते.
2. लग्न करण्यापूर्वी जोडीदाराच्या नोकरीची व्यवस्थित माहिती करुन घ्या. लग्नापूर्वी
3.होणाऱ्या जोडीदाराची आवड-निवड जाणून घ्या.
4. फॅमेली प्लॅनिंगवर चर्चा करा. मुले किती आणि केव्हा हवीत, यावर बोला.
5. महत्त्वाच म्हणजे तुम्हाला एकत्र कुटुंबात राहायच किंवा स्वतंत्र कुटुंबात राहायच याची चर्चा करा.
6. कुटुंबातील व्यक्तींविषयी देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
22-06-2019
21-06-2019
24-02-2019
जायफळाचा वापर आपल्या स्वयंपाकघरात सर्वाधिक करण्यात येतो. अनेक शारिरिक समस्या दूर करण्यासाठी देखील जायफळ फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का,जायफळ सौदर्याच्या समस्या दूर करण्यासाठी देखील अत्यंत गुणकारी आहे.
आपली स्कीनला नैसर्गिक पद्धतीने क्लिंज करण्यासाठी जायफळाचा उपयोग करता येतो. यासाठी एक चम्मच जायफळ पावडर, 1 ते 2चमचे दूध घ्या. दोन्ही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी. सुमारे 15 मिनिटांनी धुउन काढा. तुमची स्कीन सुंदर आणि मुलायम होईल.
....24-02-2019
आपल्याला माहिती आहे की, गळ्यात मंगळसूत्र घालतात. मात्र सध्या नुकतच सोनमने लग्न केले. त्यावेळी तिने गळ्यात मंगळसूत्र घालण्याऐवजी हातात घालणारे मंगळसूत्र बनवले.
तिच फॅशन सध्या बाजारात आली आहे. महिला आता गळ्यात नाही तर हातात देखील ब्रेस्लेटसारखे मंगळसूत्र वापरत आहेत.
सोनममुळे महिलांना ही नवीन आयडीया आली आहे.
त्यात तुम्हील पाहिजे तशी डिझाईन बनवून घेऊ शकता. यांची किंमत देखील फार नाही.
....24-02-2019
बदलत्या वातावरणामुळे केस अकाली पांढरे होत आहे. त्यामुळे केसांना कलर करण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र केसांना डाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्हा डाय करणार असले तर केसांना सूट होईल, अशाच रंगाची निवड करा.
केसांना डाय करताना आपत्या हातात हँडग्लोज घालावे. जेणेकरून डायमधील केमीकलचा तुमच्या त्वचेशी संपर्ण होत नाही.
डायमध्ये अनेक प्रकारचे केमिकल असतात. त्यामुळे आधी कानामागे लाऊन त्याची टेस्ट घ्या.
डाय केल्यानंतर केस केवळ पाण्याने धुवून घ्यावी. दुसऱ्या दिवशीय शाम्पू केला तरी चालेल.
....18-02-2019
जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबरच थकल्या सारखे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला सकाळी कोणते ज्युसचे सेवन केले पाहिजे याची माहिती देणार आहोत.
सकाळी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन केले पाहिजे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात यामुळे दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. आणि थकवा पण येत नाही.
पालक, पुदीना अशा हिरव्या पालेभाज्याचा ज्युस सकाळी प्यावा. त्यामुळे सुध्दा एनर्जी वाढते.
सकाळी उठल्याबरोबर नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी देखील आपल्या शरीरातील थकवा दूर करते. नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात.
....18-02-2019
सोशल मीडिया यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता आपण व्हॉट्स ऍपमध्ये Facebook, YouTube आणि Instagram च्या व्हिडिओ पाहू शकणार आहोत.
WhatsApp ने लेटेस्ट अपडेट 0.3.2041 मध्ये आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर हे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी सपोर्ट जोडला आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, की WhatsApp वर आता Facebook, youtube आणि Instagram चे व्हिडिओज बघता येणार आहेत.
यासाठी युझर्सला हे व्हिडिओज डाउनलोड करायची गरज राहणार नाही. हे अपडेट युझर्सला इन्स्टॉल करण्याची गरज पण नाही. जेव्हा ही युझर WhatsApp वेब ओपन करणार जर त्यावेळी नवीन अपडेट उपलब्ध असले तर ते ऑटोमॅटिक इन्स्टॉल होणार.
....13-02-2019
गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने महिलांवर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. गोळ्यांचे सेवन करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्याची क्षमता कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महिलांच्या अंतरंग संबंधावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता एका अभ्यासातून समोर आली आहे.
जर्मनीतील ग्रीफ्सवाल्ड विद्यापीठात शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या महिलांमध्ये हावभाव ओळखण्याच्या क्षमतेत किंचीत परिणाम झाल्याचे नमूद केले. या अभ्यासामुळे गर्भनिरोधक गोळ्याच्या वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच या गोळ्यांमुळे गर्भाशय आणि पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता या अभ्यास व्यक्त करण्यात आली आहे.
....13-02-2019
न्यूयॉर्क
वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी प्रेम आणि समजदारीच पुरेशी नाही. त्यासाठी जीन्सची भूमिका देखील महत्त्वाची असते. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. याआधी केलेल्या संशोधनात याचे संकेत मिळाले होते की, वैवाहिक जिवन काही प्रमाणात आनुवांशिक कारणांमुळे प्रभावित होते.
नुकत्याच झालेल्या शोधानुसार विशेष जीन्समध्ये भिन्नता ऑक्सीटोसिनची कार्यपद्धती कारणीभूत असते. ही समग्र स्वरुपात वैवाहिक जीवनावर परिणाम करते. जीन्स दोन पार्टनरमध्ये समन्वय साधण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण असतात.
यशस्वी वैवाहिक जीवनासाठी जीन्सचे महत्त्व आहे. कारण व्यक्तीसाठी जीन्स प्रासंगिक असतात आणि व्यक्तीची विशेषता त्याच्या वैवाहिक जिवनावर परिणाम करत असते, अस अमेरिकेच्या बिंघमटन विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर रिचर्ड मॅटसन यांनी सांगितले.
....12-02-2019
लवंग आपल्या किचनमध्ये वापरण्यात येते. लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. तोंडाची दुर्गंध येऊ नये म्हणून लवंग खाल्ली जाते. लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतो. त्यामुळे माणसाचे विविध रोगापासुन संरक्षण होते.
लवंगाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. आणि हाडाचे विकार टळतात. केसांसाठी लवंगाचे तेल उपयुक्त असते. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर लवंगाचे तेल यावर एक रामबाण उपाय आहे.
दात दुखीवर लवंग एक चांगला उपाय आहे. त्यामुळेच 99 टक्के टूथपेस्टमध्ये लवंग असते. तसेच खोकला व सर्दीवर लवंग खाल्यास आराम मिळतो. लवंगेमध्ये तणाव दुर करणारे गुणही असतात. चहामध्ये लवंग टाकावी. त्यामुळे तणाव दुर होतो.
....