23-02-2019
मुंबई
सलमान खानच्या प्रोडक्शनमध्ये तयार होत असलेला लव्हस्टोरी चित्रपट असलेल्या नोटबुकचे ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाले. हा चित्रपट काश्मीरवर आधारित आहे. यामध्ये एका शाळेतील दोन शिक्षकांचं प्रेम दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटातून अभिनेत्री नुतनची नात प्रानुतन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. तर लीड रोलमध्ये अभिनेता जहीर इक्बाल आहे.
ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले की, शाळेतील शिक्षक त्याच शाळेत आधी शिक्षिका असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो.
....13-02-2019
मुंबई
अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चित केसरी चित्रपटाची एक छोटीशी झलक अर्थात टीजर मंगळवारी रिलीज करण्यात आले. याआधी चित्रपटाचे अनेक पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद गोष्ट दाखवण्यात आली आहे.
राज कंवरचे असिस्टंट राहिलेले अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात भारतीय वीरांचे शौर्य दाखविण्यात आले आहे. या टीझरमध्ये अक्षय कुमार त्याच्या पलटनसोबत दिसतो. अक्षय यात सिख अवतारात दिसून येणार आहे. या चित्रपटात परिनिती चोपडा देखील मुख्य भूमिकेत दिसून येते. आज मेरी पगडी भी केसरी अशी चित्रपटाची टॅग लाईन आहे.
....12-02-2019
इंटरनेट सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियाचा आरु अदार लव्ह वेलेंटाईन डेच्या अर्थात 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील प्रियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रियांची लोकप्रियता 24 तासात कित्येक पटीने वाढली आहे.
एक दिवसापूर्वी प्रियाचे इन्स्टाग्रामवर 2.49 लाख फॉलोवर्स होते. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 24 तासात प्रियाच्या फॉलोवर्सचा अकडा 10 लाखांवर पोहोचला आहे. याआधी प्रियांचा चित्रपटातील लीप लॉक सिन देखील व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ यूट्यूबवर आतापर्यंत 20 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
....12-02-2019
चीनच्या चेंगदू रिसर्च बेस ऑफ जायंट पांडा ब्रिडींगमध्ये एक आठ वर्षांची मुलगी जायंट पांडाच्या पिंजऱ्यात पडली. मुलगी पिंजऱ्यात पडली त्यावेळी तीन पांडा तेथे होते. लोकांना वाटतं पांडा क्युट आणि घातक जनावर नाही. मात्र हा त्यांचा गैरसमज आहे. अनेकदा पांडा लोकांवर हल्ला केल्यानंतर हिंसक होतात.
चायना डेलीच्या वृत्तानुसार सिक्युरीटी गार्डने मुलीला वाचवण्यासाठी खडतर कष्ट केले. व्हिडिओमध्ये पडलेल्या मुलीला बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षक काठीची मदत घेत आहेत. त्याचवेळी दोन पांडा मुलीच्या जवळ आले. मात्र सुरक्षरक्षकांनी दुसऱ्या लोकांच्या मदतीने मुलीला बाहेर काढले.
....