‘काश्मीरी विद्यार्थांना मारहाण करणाऱ्यांना शिवसेनेतून काढले’

24-02-2019

मुंबई

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभुमीवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही काश्‍मिरी विद्यार्थांना मारहाण झाली. याची गंभीर दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मरहाण करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे.

मारहाण झालेले हे विद्यार्थी यवतमाळमधील दयाभाई पटेल फिजीकल एज्युकेशन कॉलेजमध्ये शिकत आहेत. बुधवारी रात्री युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे. जम्मू काश्‍मीर हा भारताचा भाग आहे. त्यामुळे दहशतवादाबाबत जबाबदार धरून कोणाही भारतीयाला रोषाला सामोरे जायला लागता कामा नये, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

Related News