काँग्रेसकडून विधानसभेची तयारी सुरू

02-07-2019

पुणे – सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ऑक्‍टोबर २०१९ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय मुंबई येथे पोस्ट, ईमेल, कुरिअर, फॅक्‍स अथवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत.

Related News