मनिकर्णिकाचा बॉक्सऑफीसवर धडाका; 100 कोटी क्लबमध्ये होणार सामील

12-02-2019

नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेला कंगना रनौत हिचा मनिकर्णिका चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात देखील आपल्या कमाईचा धडाका कायम ठेवला आहे. दुसऱ्या आठवड्यात जगभरात 100 कोटींची कमाई करणारा मनिकर्णिका कमाईच्या बाबतीत भारतात देखील 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची मार्गावर आहे.

राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित या चित्रपटाने भारतात 17 दिवसांत 91.70 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाला बॉलिवूडमधून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंगना नाराज आहे. तसेच तिने आमीर खान, आलिया भट्ट, ट्विंकल खन्ना यांना देखील प्रतिक्रिया न दिल्यामुळे फटकारले आहे.

Related News