कपील शर्माचे देखील झाले लैंगिक शोषण ?

12-02-2019

मुंबई

हास्य अभिनेता कपील शर्मा याचे देखील लैंगिक शोषण झाले आहे. याची कबुली खुद्द कपीलने दिली आहे. तेही त्याच्या लग्नातच झाल्याचे कपीलने सांगितले. कपिल म्हणाला की, त्याच्या लग्नात एक व्यक्ती त्याला अनेकदा किस्स करण्याचा प्रयत्न करत होता.

सुपर डान्सर शोमध्ये कपील शर्मा शिल्पा शेट्टी हिच्यासोबत सामील झाला होता. यावेळी त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे.  माझ्या लग्नात एक व्यक्ती जो की प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहायचा आणि माझे अभिनंदन करण्याच्या बहाण्याने मला किस करायचा. मात्र तो व्यक्त कोण होता, हे मला शेवटपर्यंत कळले नाही, असंही त्याने सांगितले. त्याच्या या कारनाम्यामुळे त्रस्त झालो होतो, असंही कपील म्हणाला.

Related News