12-02-2019
करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये सारा अली खानने कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची गोष्ट छेडली होती. तेव्हापासून दोघांच्या अफवा सोशल मीडियावर गरम आहेत. त्यानंतर कार्तिक आर्यनने देखील साराच्या डेटला प्रत्युत्तर दिले होते.
दरम्यान कार्तिक आणि कृती सेनन करणच्या शोमध्ये आले होते. त्यात त्याने साराला डेटवर नेणे कठिण असल्याचे सांगत त्याचे कारण देखील सांगितले. सैफ अली खानने ठेवलेल्या अटींमुळे आपण साराला डेटवर नेऊ शकत नसल्याचे यावेळी कार्तिकने सांगितले.
सध्या मी पैसा कमावण्याच्या मागे लागलो आहे. त्याचे कारण म्हणजे सैफ आहे. सारा राजकुमारी आहे. तिला डेटवर नेण्यासाठी खुप पैसा लागतो, असंह सैफने म्हटले होते. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे पैसा येईल तेव्हा मी तिला डेटवर घेऊन जाईल, असंही त्याने सांगितले.
05-07-2019
05-07-2019
24-02-2019
24-02-2019
23-02-2019