व्हिडिओ व्हायरल होताच, प्रियाचे 24 तासांत झाले 10 लाख फॉलोवर्स

12-02-2019

मुंबई

इंटरनेट सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियाचा आरु अदार लव्ह वेलेंटाईन डेच्या अर्थात 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील प्रियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रियांची लोकप्रियता 24 तासात कित्येक पटीने वाढली आहे.

एक दिवसापूर्वी प्रियाचे इन्स्टाग्रामवर 2.49 लाख फॉलोवर्स होते. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 24 तासात प्रियाच्या फॉलोवर्सचा अकडा 10 लाखांवर पोहोचला आहे. याआधी प्रियांचा चित्रपटातील लीप लॉक सिन देखील व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ यूट्यूबवर आतापर्यंत 20 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.