तब्बल 19 वर्षानंतर सलमान-भन्साळी येणार एकत्र

24-02-2019

मुंबई

अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी तब्बल १९ वर्षानंतर एकत्र येणार आहेत. भन्साळी यांनी सलमान खानसोबत 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' हे सुपरहिट चित्रपट केले आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला घेऊन ते एका प्रेमकथेवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.

भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमानसोबत नवोदित अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे कथानक अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप चित्रपटाचीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

Related News