‘बागी 3’ संदर्भात खुलासा; ‘ही’ अभिनेत्री असणार टायगरची हिरोईन

12-02-2019

मुंबई

नवी दिल्ली

टायगर श्रॉफच्या आगामी बागी 3 चित्रपटाची हिरोईन निश्चित झाली आहे. टायगरची सुपरहिट एक्शन फ्रेंचायसी असलेल्या बागी चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. या दोघांची जोडी पहिल्या बागी चित्रपटात दिसली होती.

गेल्या वर्षी साजिद नडियावालाने बागी दोन रिलीज होण्यापूर्वीच बागी तीनची घोषणा केली होती. त्यामुळे टायगरच्या चाहत्यांना ही बातमी आनंद देणारी ठरणार आहे. बागी चित्रपटांत आतापर्यंत टायगर श्रॉफची जबरदस्त एक्शन पाहायला मिळाली आहे.

Related News