‘उरी’ची कामाई पोहोचली बाहुबलीच्या कमाईसमीप

12-02-2019

मुंबई

उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट कमाईच्या बाबतीत दरदिवशी नवीन विक्रम रचत आहे. या चित्रपट विक्की कौशल आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम रचला असून चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बाहुबली चित्रपटाची बरोबरी केली आहे.

चित्रपटाचा बॉक्सऑफिसवर पाचवा आठवडा आहे. चित्रपटाने आतापर्यंत 200 हून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने पाचव्या आठवड्यात एकूण 12 कोटींची कमाई केली आहे. बाहुबली चित्रपटाने देखील पाचव्या आठवड्यात 12 कोटी रुपये कमावले होते. आता उरी चित्रपट सनी देओलच्या गदर एक प्रेमकथा चित्रपटाला मागे टाकण्याची शक्यता आहे.

Related News