02-07-2019
मुसळधार पावसामुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत केले आहे. त्यात आता याचा फटका सामान्यांसह बॉलिवूड कलाकारांना देखील सहन करावा लागत आहे.मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यात जुहूमध्ये सर्वाधिक पाणी साचले आहे.यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील मुंबईच्या स्थितीवर भाष्य केले आहे.
त्यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली.दरम्यान स्वतः अमिताभ यांनी मुंबईच्या पावसावर एक ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवांशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत.
बच्चन यांनी त्यांच्या सिनेमातील एक फोटो शेअर केला. यात त्यांच्यासोबत झिनत अमान देखील आहेत. यात ते एका होडीत बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘दादा, जरा गोरेगावला न्या’. या फोटोच्यावर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला.
05-07-2019
05-07-2019
24-02-2019
24-02-2019
23-02-2019