पाकवरील हल्ल्यामुळे कर्नाटकमध्ये भाजप 22 जागा जिंकेल : येडियुरप्पा

28-02-2019

बंगळुरू

पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे राजकारण करण्यास भारतीय जनता पक्षाने राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी म्हटले की, भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईमुळे भाजपला कर्नाटकमधील लोकसभेच्या 28 पैकी 22 जागांवर विजय मिळेल.

पाकवरील कारवाईमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. या कारवाईमुळे तरुणांमध्ये उत्साह आला आहे. त्यामुळे कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 जागा जिंकण्यासाठी लाभ होईल, अंसही युडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दरम्यान सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपवर करत आहेत.

 

Related News