मुलांच्या खेळण्यावरुन वाद, महिलेवर प्राणघातक हल्ला

22-06-2019

बारामती – शहरात सध्या गुन्हेगारी वाढत आहे. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. खाटीक गल्ली परिसरात एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. या हल्ल्यात महिला गंभीर रित्या जखमी झाली असून उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

खाटीक गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशी याने तांदळवाडी येथे राहत असलेल्या जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात शिरून तिच्यावर सत्तुराने हल्ला केला. आरोपीने या महिलेच्या मानेवर, तोंडावर आणि हातावर वार केले. यामध्ये ही महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.