अरे बापरे भली मोठी रक्कम घेऊन दुबईच्या राजाची सहावी पत्नी गेली या देशात

03-07-2019

दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची ६ वी पत्नी हया बिंत अल हुसेन या आपल्या दोन मुलांसह ३१ दशलक्ष पौंड एवढी रक्कम घेऊन देश सोडून गेल्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

मात्र, त्यांच्या पलायनावरुन जर्मनी आणि युएई या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्‍यता आहे. कारण जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे. हया यांना परत पाठवा अशी मागणी दुबईचे राजे शेख मोहम्मद यांनी जर्मन सरकारकडे केल्याचे समजते. मात्र त्यांना परत पाठवण्यासाठी जर्मन सरकारने विरोध केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Related News