अभिनेत्री अमृता खानविलकरचे इस्टांग्राम अकाउंट हॅक

24-02-2019

मुंबई

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. तिचे फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांमध्ये फॉलोअरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे.

अमृताने स्वत: या संदर्भात माहिती दिली आहे. तिच्या फोन मध्ये चालु असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंट तिने ही माहिती चाहत्यांना शेअर केली आहे. एका अनोळखी व्यक्तीने माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केलं असून ,या अकाऊंटवरुन एखादा फोटो, व्हिडिओ किंवा कोणताही मेसेज आला तर तो, मी किंवा माझ्या टीममधील कोणत्याही व्यक्तीने केलेला नसेल. याची मी तक्रार दाखल केली असल्याचे देखील अमृताने सांगितले.

Related News