डॅनिच्या मुलाचे बॉलिवूड डेब्यू ; सोबत दिसणार अनिता राजची मुलगी

28-02-2019

मुंबई

करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात लहानपणीच्या करिना कपूरची भूमिका साकारणारी मालविका राज बॉलिवूडमध्ये डेब्यु करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालविका डॅनी डेन्जोंगपाचा मुलगा रिनजिंग याच्यासोबत आपला पहिला चित्रपट कऱणार आहे.

रिनजिंग डॅनाचा मुलगा असून मालविका अभिनेत्री अनिता राज हिची मुलगी आहे. या दोन्ही कलाकारांनी एक्शन थ्रिलर फिल्स स्क्वॉडमध्ये सोबत काम केलेले आहे.

मालविका आणि रिनजिंग यांच्या चित्रपटाची शुटींग याच वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. दोघेही लहापणापासून एकमेकांचे मित्र आहेत.

Related News