काश्मीरमध्ये वायुसेनेचे मीग विमान कोसळले; दोन पायलट शहिद

27-02-2019

नवी दिल्ली

जम्मू काश्मीरच्या बडगामपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गारेंद गावांत एक मीग लढाऊ विमान कोसळले. हे विमान शेतात कोसळले त्यानंतर त्यात आग लागली. अपघाताचे काऱण अद्याप स्पष्ट झाले नाही.

या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. या विमानाने श्रीनगर एअरबेसमधून टेकऑफ केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मीग विमान पेट्रोलिंगवर होते, त्याचवेळी ते क्रश झाले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान वेगाने जमिनीकडे येत होते, त्यानंतर मोठा आवाज झाला आणि विमान जमिनीवर कोसळले.

Related News