24-02-2019
२५ ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम याचा रविवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. नऊ वर्षापासून मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेला दहशतवादी मोहम्मद हनिफचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे.
तब्बल ५२ निरपराध्यांना मृत्यूच्या दारात टाकणारा मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम हा मृत्यूदंडाची शिक्षा भोगत होता. २५ ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार होता. त्यावळी झवेरी मार्केटमध्ये झालेल्या भयावह स्फोटात ३६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १३८ जण गंभीर जखमी झाले होते तर, गेट वे ऑफ इंडियाजवळ घडवून आणलेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू तर ३६ लोकांना गंभीर दुखापत झाली होती.