02-07-2019
नवी दिल्ली – भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या पुत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भडकले. आमदार आकाश विजयवर्गीय यांचा एका महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या घटनेवर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणाचाही मुलगा असो त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे नाव न घेता मोदी यांनी सुनावले.
मोदी म्हणाले कि, कोणात्याही नेत्याच्या मुलाचे असे वर्तन सहन केले जाणार नाही. या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यांनाही पक्षात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्या सर्वांना पक्षातून बाहेर काढायला हवे, अशा कडक शब्दात मोदींनी सुनावले.
05-07-2019
24-06-2019
28-02-2019
27-02-2019