सलमानच्या आगामी ‘नोटबूक’मध्ये अनोखी लव्हस्टोरी

23-02-2019

मुंबई

सलमान खानच्या प्रोडक्शनमध्ये तयार होत असलेला लव्हस्टोरी चित्रपट असलेल्या नोटबुकचे ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाले. हा चित्रपट काश्मीरवर आधारित आहे. यामध्ये एका शाळेतील दोन शिक्षकांचं प्रेम दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटातून अभिनेत्री नुतनची नात प्रानुतन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. तर लीड रोलमध्ये अभिनेता जहीर इक्बाल आहे.

ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले की, शाळेतील शिक्षक त्याच शाळेत आधी शिक्षिका असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो.