अभिनंदन परतण्याचे श्रेय नवज्योत सिंग सिद्धूचे : ओमान चंडी

02-03-2019

नवी दिल्ली

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले. पाकिस्तानचे लढावू विमान एफ-16 पाडल्यानंतर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले होते. जिनेव्हा संधीनुसार पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना भारतकडे सोपविले. वाघा बॉर्डरवर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले.

भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन यांचे पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते. त्यावेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती.

अभिनंदन यांच्या मुक्ततेनंतर अनेक नेत्यांची त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

चंडी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नवज्योत सिंग सिंद्धूचे प्रयत्न आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच सद्भावनेसाठी धन्यवाद. यापुढे सीमेवर शांती निर्माण होईल. त्यावर सिद्ध यांनी रिट्विट करताना म्हटले की आपण माझा उत्साह वाढविला. त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी मला आणखी साहस मिळेल.

Related News