पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडण्यात भारताला यश

27-02-2019

नवी दिल्ली

जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना हुसकून लावण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दोन पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या वायु सीमेचे उल्लंघन केले होते. यावेळी भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे एक लढाऊ विमान त्यांच्यात हद्दीत कोसळल्याचे वृत्त आहे.

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी जेट्स घुसल्यानंतर लगेच भारतीय वायुदलाना कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमान हद्दीतून पळून गेले. यावेळी या विमानांनी परत जाताना भारतीय हद्दीत बॉम्ब टाकले होते.

Related News