‘त्या’ एनकाऊंटर स्पेशलिस्टचे होतेय सर्वत्र कौतुक

24-06-2019

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका ६ महिन्याच्या लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. या प्रकरणातील हत्येचा मुख्य आरोपी नाजिलला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये आरोपीला अटक करण्यात आले आहे.

रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट ‘अजय पाल शर्मा’ यांनी चकमकीदरम्यान आरोपीच्या दोन्ही पायावर गोळ्या घालत पकडले आहे. त्यानंतर, एसपी अजय पाल शर्मा यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related News