पुढील २ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

01-07-2019

पुणे – आज पुणे शहरात दिवसभरापासून पाऊस सुरू आहे. आणि पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. असा अंदाज माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. पुणे शहरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर निघावे.

Related News