‘येत्या दोन-तीन दिवसात जोरदार पाऊस होणार’

21-06-2019

मागच्या अनेक दिवसांपासून आपण सगळे जण पावसाची वाट पाहत आहोत, मात्र पाऊस काही पडत नाही असे चित्र आहे.  मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार ही माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली.

रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची एंट्री झाली आहे.

Related News