बेस्ट नवरा होण्यासाठी रणवीरने करिनाला मागितल्या टीप्स

28-02-2019

मुंबई

अभिनेत्री करिना कपूर हिचा रोडियो शो व्हॉट वुमन वॉन्ट चांगलाच पॉप्युलर होत आहे. या शोमध्ये महिलांविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत. या शोमध्ये करिना कपूरच्या अधिकाअधिका पाहुण्या महिलाच असतात. आता हा शो एवढा प्रसिद्ध झाला की, अनेकजण करिनाला सल्ला मागत आहेत.

यामध्ये आता अभिनेता रणवीर सिंह याचे नाव जोडले आहे. रणवीरने नुकताच करिनाला सल्ला मागितला आहे. पत्नी दीपिकासाठी मी बेस्ट नवरा होण्यासाठी मी काय करू, यासाठी मला टीप्स दे असंही रणवीरने म्हटले आहे. त्यावर करिनाने शानदार उत्तर दिले आहे. करिना म्हणाली की, सर्वांना ठावूक आहे, तु दीपिकावर किती प्रेम करतोस. त्यामुळे तुला कोणत्याही टीप्सची गरज नाही, असही करिनाने ट्विटरवरून सांगितले.

Related News