समझोता एक्सप्रेस 27 प्रवाशांना घेऊन पाकिस्तानला रवाना

28-02-2019

नवी दिल्ली

भारतीय रेल्वेती समझोता एक्सप्रेस सोमवारी 27 प्रवाशांना घेऊन आपल्या निर्धारित वेळेत पाकिस्तानला रवाना झाली. याआधी चर्चा होती की पाकिस्तानने आपल्या आणि वाघा ते लाहोर दरम्यान समझोता एक्सप्रेस रोखली होती.

उत्तर रेल्वेने म्हटले की, भारतातून दिल्लीहून अटारीला जाणारी रेल्वे बुधवारी रात्री 11.20 वाजता रवाना झाली. रेल्वेत तीन पाकिस्तानी आणि 24 भारतीय नागरिक होते. एकून रेल्वेत 27 प्रवाशी असून यामध्ये चार प्रवाशी वातानुकुलीत आणि 23 प्रवाशी बिगरवातानुकुलीत डब्ब्यांमध्ये होते.

दरम्यान समझोता एक्सप्रेसची फेऱ्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून काहीही सुचना मिळाल्या नसल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. आहे.

Related News