05-07-2019
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होताच लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरले नाही.
बजेट दरम्यान निफ्टी ११२ अंकांनी कमी होऊन ११८३४ अंकांवर आला आहे. तर सेन्सेक्स ३५० पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन ३९५५० च्या स्तरावर आला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत घसरण सुरू आहे.
बँकेच्या डिजिटल देवाण घेवाणीवर चार्ज लागू झाल्यामुळे बँक निफ्टीत जोरदार घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टीत ६४ अंकांची घसरण होऊन ३१४०७ अंकांवर पोचली आहे.
02-07-2019
24-06-2019
28-02-2019
27-02-2019