सोहामध्ये प्रभाससोबत थिरकणार सलमानची हिरोईन

05-07-2019

बाहुबली फेम अभिनेता प्रभास हिंदी चित्रपट सोहात मुख्य भूमिका करत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची आवडती हिरोईन जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.

या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे.

Related News