स्वरा भास्करचे हिमांशू शर्मासोबत ब्रेकअप

05-07-2019

स्वरा भास्कर आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग राइटर हिमांशु शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. तब्बल ५ वर्षापासून त्यांचे नाते होते. ते कायम एकमेकांसोबत होते. मात्र आता त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.

हे जोडपे २०१५ पासून रिलेशनशिप मध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा आणि हिमांशू हे एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत. हिमांशु अलीकडे स्वराच्या भावाच्या लग्नात देखील शामिल झाला होता. हे दोघे एकमेकांपासून वेगळे होतील वाटले नव्हते. मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नेमक कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Related News