02-03-2019
साउथची स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे. बॉलिवूडमध्ये देखील ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिने बाहुबली, अयान आणि वीरम चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या करियर व्यतिरिक्त तमन्ना आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
एकेकाळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी विराट किंवा तमन्ना या दोघांनी देखील यावर काहीही बोलने टाळले. दोघांनी एका मोबाईलच्या जाहिरातीत सोबत काम केले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
तमन्नाने कोहलीसोबतच्या अफेअरवर अखेर मौन सोडले आहे. ती म्हणाली, की त्या जाहिरातीनंतर मी विराटला कधीच भेटले नाही. त्या जाहिरातीत मी फक्त चार शब्द बोललो होते, असंही तिने म्हटले.
05-07-2019
05-07-2019
24-02-2019
24-02-2019
23-02-2019