विराट अन् आजीबाईंचा फोटो पाहून अनुष्काने केली ही कमेंट्स

03-07-2019

विश्वचषकतील उपांत्य फेरीसाठी खेळला जाणारा सामन्यात भारताने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. त्यादरम्यान ८७ वर्षांच्या आजींनी भारताला हातात भली मोठी पिपाणी घेऊन चेअर केल.सामना संपेपर्यंत त्या आजी एवढ्या प्रसिद्ध झाल्या की भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्वतः त्यांची भेट घेतली.

विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आजीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.फक्त विराटच नाही तर रोहित शर्मानेही या आजींची भेट घेतली.


मात्र सध्या सोशल मीडियावर विराटच्या या भेटीच वैयक्तीक कौतुक केलं जात आहे.
सोशल मीडियावर विराटचे चाहतेच नाही तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने देखील विराटचे कौतुक केले आहे.

सामना संपल्यानंतर विराटने आजींसोबतचे काही फोटो शेअर केले. आणि खास संदेश लिहिला. त्यात तो म्हणाला की, ‘एवढ्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी सगळ्या चाहत्यांचे धन्यवाद खास करुन चारुलता पटेल यांचे आभार.

Related News