लग्नाआधी जोडीदाराला हे प्रश्न अवश्य विचारा…

24-06-2019

लग्न हा प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे योग्य जोडीदार मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी लग्नापूर्वी जोडीदाराला हे प्रश्न अवश्य विचारा…

1. हे लग्न मनाविरुद्ध तर करत नाहीस ना? असे स्पष्टपणे होणाऱ्या जोडीदाराला दोघांनी विचारावे.
कारण काहीजण अनेकदा कौटुंबिक दबावाखाली लग्न करतात आणि मग दोघांचीही वाताहत होते. किंवा लग्नानंतर विभक्त होण्याची नामुष्की ओढावते.

2. लग्न करण्यापूर्वी जोडीदाराच्या नोकरीची व्यवस्थित माहिती करुन घ्या. लग्नापूर्वी
3.होणाऱ्या जोडीदाराची आवड-निवड जाणून घ्या.
4. फॅमेली प्लॅनिंगवर चर्चा करा. मुले किती आणि केव्हा हवीत, यावर बोला.
5. महत्त्वाच म्हणजे तुम्हाला एकत्र कुटुंबात राहायच किंवा स्वतंत्र कुटुंबात राहायच याची चर्चा करा.
6. कुटुंबातील व्यक्तींविषयी देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.