लंवग खाण्याचे फायदे

12-02-2019

लवंग आपल्या किचनमध्ये वापरण्यात येते. लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. तोंडाची दुर्गंध येऊ नये म्हणून लवंग खाल्ली जाते. लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतो. त्यामुळे माणसाचे विविध रोगापासुन संरक्षण होते.

लवंगाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. आणि हाडाचे विकार टळतात. केसांसाठी लवंगाचे तेल उपयुक्त असते. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर लवंगाचे तेल यावर एक रामबाण उपाय आहे.

दात दुखीवर लवंग एक चांगला उपाय आहे. त्यामुळेच 99 टक्के टूथपेस्टमध्ये लवंग असते. तसेच खोकला व सर्दीवर लवंग खाल्यास आराम मिळतो. लवंगेमध्ये तणाव दुर करणारे गुणही असतात. चहामध्ये लवंग टाकावी. त्यामुळे तणाव दुर होतो.