जायफळने वाढवा सौंदर्य..

24-02-2019

जायफळाचा वापर आपल्या स्वयंपाकघरात सर्वाधिक करण्यात येतो. अनेक शारिरिक समस्या दूर करण्यासाठी देखील जायफळ फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का,जायफळ सौदर्याच्या समस्या दूर करण्यासाठी देखील अत्यंत गुणकारी आहे.

आपली स्कीनला नैसर्गिक पद्धतीने क्लिंज करण्यासाठी जायफळाचा उपयोग करता येतो. यासाठी एक चम्मच जायफळ पावडर, 1 ते 2चमचे दूध घ्या. दोन्ही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी. सुमारे 15 मिनिटांनी धुउन काढा. तुमची स्कीन सुंदर आणि मुलायम होईल.