'या' ज्यूसच्या सेवनाने ताजेतवाने राहणे सहज शक्य

18-02-2019

जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबरच थकल्या सारखे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला सकाळी कोणते ज्युसचे सेवन केले पाहिजे याची माहिती देणार आहोत.

सकाळी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन केले पाहिजे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात यामुळे दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. आणि थकवा पण येत नाही.

पालक, पुदीना अशा हिरव्या पालेभाज्याचा ज्युस सकाळी प्यावा. त्यामुळे सुध्दा एनर्जी वाढते.

सकाळी उठल्याबरोबर नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी देखील आपल्या शरीरातील थकवा दूर करते. नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात.