...यामुळे लग्नानंतर सुखी राहतात नवरा-बायको

13-02-2019

न्यूयॉर्क

वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी प्रेम आणि समजदारीच पुरेशी नाही. त्यासाठी जीन्सची भूमिका देखील महत्त्वाची असते. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. याआधी केलेल्या संशोधनात याचे संकेत मिळाले होते की, वैवाहिक जिवन काही प्रमाणात आनुवांशिक कारणांमुळे प्रभावित होते.

नुकत्याच झालेल्या शोधानुसार विशेष जीन्समध्ये भिन्नता ऑक्सीटोसिनची कार्यपद्धती कारणीभूत असते. ही समग्र स्वरुपात वैवाहिक जीवनावर परिणाम करते. जीन्स दोन पार्टनरमध्ये समन्वय साधण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण असतात.

यशस्वी वैवाहिक जीवनासाठी जीन्सचे महत्त्व आहे. कारण व्यक्तीसाठी जीन्स प्रासंगिक असतात आणि व्यक्तीची विशेषता त्याच्या वैवाहिक जिवनावर परिणाम करत असते, अस अमेरिकेच्या बिंघमटन विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर रिचर्ड मॅटसन यांनी सांगितले.