गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने महिलांवर होतो ‘हा’ गंभीर परिणाम

13-02-2019

गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने महिलांवर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. गोळ्यांचे सेवन करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्याची क्षमता कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महिलांच्या अंतरंग संबंधावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता एका अभ्यासातून समोर आली आहे.

जर्मनीतील ग्रीफ्सवाल्ड विद्यापीठात शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या महिलांमध्ये हावभाव ओळखण्याच्या क्षमतेत किंचीत परिणाम झाल्याचे नमूद केले. या अभ्यासामुळे गर्भनिरोधक गोळ्याच्या वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच या गोळ्यांमुळे गर्भाशय आणि पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता या अभ्यास व्यक्त करण्यात आली आहे.